Sunday, April 3, 2011

किल्लेआपल्या " गडलक्ष्मी" बद्दल शिवरायांना इतका विश्वास की,
त्यांनी म्हटले होते   "दिल्लींद्रा सारखा शत्रू उरावर आहे;
तोआला तरी नवे-जुने ३६० किल्ले हजरतीस आहेत
एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी त्याला ३६० वर्षे पाहिजेत !''

रायगड

Picture
   छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुद्धा याच गडावर! अखेरची सात वर्षे त्यांनी या गडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला. तत्पूर्वीच्या इतिहासकाळात हा गड `रायरी' या नावाने ओळखला जात असे.
मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. संपर्काच्या दृष्टीने व कारभाराच्या दृष्टीने तो शिवरायांना इतर किल्ल्यांपेक्षा अधिक सोयीचा वाटला. रायगड येथे राजधानी असल्याने या किल्ल्यात सर्व सोयीसुविधा होत्या. एक नगरीच तेथे वसवण्यात आली होती. समुद्र सपाटीपासून जवळजवळ ८५५ मीटर उंच असलेल्या रायगडावर जाण्यासाठी पायऱ्या असून त्याशिवाय असलेले अन्य मार्ग अतिशय कठिण आणि अवघड आहेत.रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून उत्तरेला सुमारे २६ कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या माथ्यावर हा किल्ला उभा आहे. सभोवताली पर्वतराई, खोल दऱ्या आणि भुरळ घालणारी निसर्ग यामुळे हा किल्ला शोभिवंत दिसतो. या किल्ल्याचा भक्कमपणा, त्याची उंची, अवघड जागा आणि अजिंक्यतारा पाहून युरोपियन लोक त्यास `पूर्वेकडील जिब्रॉल्टर' म्हणतात.
किल्ल्यावर आजही गंगासागर तलाव, बालेकिल्ला, नगारखाना, राज दरबार, रंगमहाल, जगदीश्वर मंदिर या वास्तू आपल्याला पहायला मिळतात. महाराजांचे समाधीस्थळ ही तर रायगडावरील एक पवित्र निशाणी होयराजगड

Picture
        राजगड किल्ला साधारण २००० वर्षापूर्वीचा आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. सन १६४५ मध्ये शिवरायांनी किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व राजगड असे नामकरण केले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकिय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.मावळभागात राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड व तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते.
तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड हा दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय, राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते.
एवढी सुरक्षितता होती म्हणुन राजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माची व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असुन समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

 प्रतापगड

Picture
  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा यामागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखान वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.
प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. ''होता जिवा म्हणून वाचला शिवा'' या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. 

सिंहगड

Picture
     सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळच्या सैन्याने हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि जीवनाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव सिंहगड असे बदलले. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करुन वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ     पडली. दोघे मोठे योध्दे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सुर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.
         शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

पुरंदर

Picture
       छत्रपती संभाजी महारांजांचा  जन्म पुरंदर किल्ल्यावरच झाला. तेव्हा नेताजी पालकर किल्लेदार होता. पुढे मुरारबाजी किल्लेदार असताना मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांनी स्वराज्यावर घाला घातला. पुरंदर किल्ला जिंकण्यासाठी दिलेरखानाने प्रयत्नांची शिकस्त केली पण पुरंदर आणि दिलेरखान यांच्यामध्ये वीर मुरारबाजी उभा ठाकला होता. दिलेरखानाने हरप्रयत्न करुन वज्रगड हा पुरंदरचा जुळा किल्ला ताब्यात आणला. त्यावर तोफा चढवून दिलेरखानाने पुरंदरवर हल्ला चढवला. पुरंदरच्या माचीवरील तटबंदी फोडून दिलेरखानाचे सैन्य पुरंदरमध्ये घुसले.
        मुरारबाजी आणि मावळ यांनी पुरंदरच्या बालेकिल्ल्याचा आसरा घेतला. मोगलांचे सैन्य पुरंदरच्या माचीत घुसलेले पाहून मुरारबाजी आणि निवडक मावळ्यांनी बालेकिल्ल्यातून बाहेर येऊन मोगली सैन्यावर प्रखर हल्ला केला. मोगल सैन्य या हल्ल्यामुळे हतबल झाले. मुरारबाजीच्या पराक्रमाने दिलेरखानही चकीत झाला. या लढाईत मुरारबाजी यांनी भीमपराक्रम गाजवून स्वामीकार्यावर आपले बलिदान दिले. पुढे तहात हा किल्ला मोगलांना मिळाला. पुढे सवाई माधवराव पेशवे यांचा जन्मही पुरंदरवर झाला. वीर मुरारबाजींच्या पराक्रमाच्या स्मृती मनात घोळवीतच आपण गडदर्शनाला सुरुवात करतो.शिवनेरी

Picture
    शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा प्राचीन कालीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर आहे.
    शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.
 या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते.किल्ला तसा फार मोठा नाही.१६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

पन्हाळा

Picture
       पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता.याचे पहिले नाव पन्नग्नालय .अफजलवधानंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८-११-१६५९ ला घेतला.किल्ला विजापुरांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला.२ मार्च १६६० मध्ये किल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला. 
    छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकुन पडले होते. गुप्तहेरांनी शोधुन काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरुन निसटले. पुढे पावनखिंडीत(घोडखिंड) नरवीर बाजी प्रभु देशपांडे यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जौहरच्या सैन्याला आपल्या प्राणांचे बलिदान देउन थोपविले.१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून किल्ला ताब्यात घेतला.पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला होता. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात.

तोरणा

Picture
     तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या पहिल्या काही किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रिच्या रांगेतून दोन पदर निघुन पुर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत तर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात.पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.
      शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा होय.गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. 

महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव 'प्रचंडगड' असे ठेवले.
पुण्याच्या नैऋत्येस पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पुर्व रेखांशावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस वेळवंडी नदी तर उत्तरेस कानद नदिचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेस कानद खिंड तर पुर्वेस बामण व खरीव खिंडी आहेत.
हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुनहा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमदयाने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावरकाही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावरलोक चढवून गड पुन्हा मराठांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय.  


 
रायरेश्र्वर
 
पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार. भोरपासून ८ कि.मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.दाट झाडी, खोल दर्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट. यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.


इतिहास :
 शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्र्वराच्या डोंगरावर. मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल निश्चित विधानमांडता येणार नाही.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : रायरेश्र्वरावर पाहण्यासारखे फार काही नाही. रायरेश्र्वराचे पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतुत पाहण्यासारखे असते. रायरेश्र्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर लक्षात येत नाही. पठारावर अलिकडेच गावं वसलेली आहेत. पठारावर भात शेतीचे प्रमाणही मोठे आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्र्वर, कोल्हेश्र्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा : 

रायरेश्र्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे.
१.
टिटेधरण कोर्लेबाजूने

पुण्याहून भोरमार्गेआंबवडे गाठावे. तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने
रायरेश्र्वरावर जाता येते. वेळ साधारण ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड
आहे.


२.
भोर-रायरी मार्गे


भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी ६ वाजता
(मुक्कामाची) गाडी येते. याच वाटेला सांबरदर्याची वाट म्हणून देखील
संबोधतात. या वाटेने रायरेश्र्वर गाठण्यास दोन तास लागतात.

३. केजंळगडावरुन केजंळगडावरुन सूणदर्याने किंवा श्र्वानदर्याने सुध्दा रायरेश्र्वरला जाता येते. राहण्याची सोय : रायरेश्र्वरावर मंदिरात किंवा गावात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी. पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे.
 
 
किल्ले हरिश्चंद्रगड
स्थान
हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे.

                


भौगोलिक माहिती


पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.


पौराणिक महत्व

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.                         गडावर जाण्याच्या वाटासह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे.खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.

कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.


                            
 


किल्ल्याबद्दल


हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा होय.
रस्त्यातील व्याघ्रशिल्प

पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.


पाहण्यासारखी ठिकाणेयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.
गणपती,हरिश्चंद्रेश्वर मंदिर


                                                             मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.कोंकणकडा

हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.
                                          हरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरख, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.

गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.
[संपादन] ऐतिहासिक महत्व

महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.


किल्ले हातगङ
 
सुरगणा नाशिक मधील एक तालुका.सह्याद्रीच्या पूर्व भागातीलएका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते.यालाच सातमाळ रांग असे म्हणतात.या सातमाळ रांगेतील किल्ले म्हणजे जणु काय एक तटबंदीच.याच रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे त्याचे नाव हातगङ या भागातील जनजीवन मात्र सामान्यच.थोडा फार आधुनिक सुविधा इथपर्यंत देखील पोहचल्या आहेत.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : 

गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात.पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते.येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे.गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत.या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत.या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुस-या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत शिरतो.या दरवाज्याला पाहून हरीहर किल्ल्याची आठवण येते.या दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुध्दा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत.या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो.गडमाथा खूप विस्तीर्ण आहे.संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो.दरवाज्यातून वर आल्यावर पाय-यांची एक वाट डावीकडे खाली उतरते.येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे.ती आजही ब-यापैकी शाबूत आहे.समोरच एक पीर सुध्दा आहे.उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके सुध्दा आहे.हे सर्व पाहून आल्या वाटेने परतावे.आता दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी.येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात.येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव सुध्दा आहे.यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून
१०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो. 
गडावर जाण्याच्या वाटा :
१. हातगडवाडी मार्गे
हातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे.नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे.येथून एक रस्ता सुरगण्याला जातो तर दुसरा सापुता-याला जातो.सापुता-याला जाणा-या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे.गावातन एक डांबरी सडक कळवणला जाते या सडकेवरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची.पुढे डावीकडे एक बुजलेली विहीर लागते.या विहीरी नंतर ५ मिनिटांनी डांबरी सडक सोडायची आणि डावीकडची डोंगरधारेवर चढत जाणारी वाट धरायची.या वाटेन १५ मिनिटात आपण एका आंब्याच्या छाडाखाली पोहचतो.कागदावर जशी आपण तिरकी रेघ मारतो तशी या झाडापासून डोंगराच्या माथ्यापर्यंत तिरघी रेघ मारावी ही तिरकी रेघ म्हणजे गडावर जाणारी वाट.पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण तास लागतो.
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी
.पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे
.जाण्यासाठी लागणारा वेळ : हातगडवाडी मार्गेपाऊण तास.
 
किल्ले हरगड

इतिहास : इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. समोर दिसणारा मुल्हेर,डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त आहे 


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

 गडमाथा तसा विस्तीर्ण आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. या पठारावर काही तटबंदीचे अवशेष आहेत. पाण्याची दोन टाकी आढळतात. एक पडके मंदिर आहे. वाड्यांचे काही अवशेष आढळतात. पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नसल्याने पाणी जवळ असणे आवश्यक आहे. गडफेरी मारताना पुढे सपाटीवर एक गुहा आढळते यात कपार भवानीचं मंदिर आहे. बाकी गडावर पाहण्यासारखे काही नसल्याने आल्या मार्गाने खिंड गाठून एक तर मुल्हेरगडावर जावे नाहीतर
मुल्हेर गावात जावे. गडफेरीस १ तास पुरतो.


                                   गडावर जाण्याच्या वाटा : 

गडावर जाण्यासाठी सध्या एकच वाट अस्तित्वात आहे. गडावर जाणारी वाट मुल्हेर गावातून जाते. मुल्हेर गावातून पुढे आल्यावर एक डांबरी रस्ता लागतो. या रस्त्याने वीस मिनिटे पुढे गेल्यावर दोन फाटे फुटतात. एक डावीकडे जातो
तर दुसरा वडाच्या झाडापासून पुढे जातो. ही वाट छोटाशा टेकडीवर असणार्या धनगर-वाडीपाशी पोहोचते. येथून उजवीकडे वळावे आणि थेट मुल्हेर व हरगड यामधील खिंड गाठावी. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास पुरतो. खिंडीत डावीकडे जाणारी वाट आपल्याला मुल्हेरगडाकडे तर उजवीकडे जाणारी वाट हरगडाकडे घेऊन जाते. वाट फारशी मळलेली नसल्यामुळे अस्पष्ट झालेली आहे. या खिंडीपासून गडमाथा गाठण्यास एक तास पुरतो.


राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : नाही.
पाण्याची सोय : नाही.
 
 

किल्ले सुधागड
'गडकोट म्हणजे राज्याचे मूळ'. गडकोट म्हणजे खजिना . गडकोट म्हणजे सैन्याचे बळ. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.


                               
इतिहास : 

सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून
असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाा मोठा सत्तेखाली या गडाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून 'सुधागड' असे नामकरण केले. 
                   
                                                               
                      गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : या गडाचा घेरा तसा मोठा आहे.गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात.गडावर पंत सचिवांचा वाडा आहे. यात ५० जणांची राहण्याची सोय होते. तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. यामध्ये २५ जणांची राहण्याची सोय होते. येथे जंगलही ब-यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात आणून सोडते. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत. 
                        
                            या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे आणून सोडते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.पाच्छापूर दरवाजा : या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.
या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.

दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील
'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून आता मात्र ते गाळाने पूर्ण भरले आहे. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :
सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे

         गावी यावे.तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात. वाट फारच दमछाक करणारी आहे.वाट सरळसोट असल्याने चुकण्याचा संभव कमी आहे. या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो. नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे.पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो.पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो. पाच्छापूर मार्गेः डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते. गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते. या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूच गावे हा परिसर दिसतो. 
          दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून आता मात्र ते गाळाने पूर्ण भरले आहे. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे.

राहण्याची सोय : पंत सचिवांचे वाडे येथे उपलब्ध असून येथे ५० माणसे राहू शकतात. तसेच भोराई देवीच्या मंदिरात देखील रहाण्याची सोय होते. 
जेवणाची सोय : जेवणाची सोय स्वतः केलेली असल्यास उत्तम. पण तसे शक्य नसल्यास गडावरती 'मोरे' नावाच्या गृहस्थाचे घर आहे. तेथे ४ ते ५ जणांची जेवणाची सोय होऊ शके
 पाण्याची सोय : गडावरतीच अनेक हौद आणि तलाव असल्याने बारामही पाण्याची सोय होते
जाण्यासाठी लागणारा वेळ : दोन तास पाच्छापूर मार्गे, तीन तास दिंडी दरवाजा मार्गे.(धोंडसे मार्ग)

किल्ले हडसर

सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. 'हडसर' हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटा पासून सुरुवात करून जीवधन ,चावंड , शिवनेरी , लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी सहा दिवसांची भटकंती आपल्याला करता येते.इतिहास : 


हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठा प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या


                       .गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :


                   हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं , नळीत खोदलेल्या पाय-या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे पाहणे म्हणजे दुर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्टच ठरते. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते. तर दुसरी वाट डावीकडे असणा-या दुस-या प्रवेशद्वारापाशी जाते. दुस-या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडेवळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. 
   
         यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके दिसते. येथून थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेली प्रशस्त गुहा लागते. मात्र ही गुहा म्हणजे पहारेक-यांची देवडीच होय. मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर अत्यंत सुरेख दिसतो. समोरच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो. येथून परत फिरून प्रवेशद्वारापाशी यावे आणि परतीच्या वाटेला लागावे.गडावर 


 
                                             


जाण्याच्या वाटा :
 या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून दुसरी वाट गावक-यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पाय-या कोरून बांधून काढलेली आहे.कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी
हडसर या गावी यावे लागते. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बुरूजापाशी येऊन पोहचतो. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणा-या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पाय-या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे. येथून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.

राहण्याची सोय : महादेवाच्या मंदिरात ४ ते ५ जणांना राहता येते. मात्र पावसाळ्यात मंदिरात पाणी साठत असल्याने राहण्याची थोडी गैरसोयच होते.

जेवणाची सोय : वर किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वतःच करावी.

पाण्याची सोय : किल्ल्यावर प्रवेशद्वारातून वरती आल्यावर समोरच बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.जाण्यासाठी 

लागणारा वेळ : १ तास
 
 
किल्ले विसापूर
पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.
इतिहास : 

मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले 

                                       गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : 
 
पाय-यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत.
गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे 

                          


गडावर जाण्याच्या वाटा : 

मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पाय-या आहेत. या पाय-या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पाय-यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
 २) दुस-या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते. 
३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.


                                                       

राहण्याची सोय : 
गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत. 


जेवणाची सोय : 
जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. 


पाण्याची सोय : 
गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत. 


जाण्यासाठी लागणारा वेळ 
: अडीच तास.
 

किल्ले मुल्हेर
सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणा-या या सह्याद्रिच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत तर दुस-या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. बागुलगेड म्हणजेच बागलाण. सुपीक, संपन्न आणि सधन असा प्रदेश. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हा प्रदेश असल्याने येथील जनजीवनावर गुजराती आणि महाराष्ट्रीय अशा संमिश्र आचारविचारांचा प्रभाव पडलेला आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बागायती शेती मोठा प्रमाणावर चालते त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती ही फार चांगली आहे. मुल्हेरचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मुल्हेर नावाचे गाव आहे.


                            


इतिहास : 
मुल्हेरचा किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते. मात्र कालांतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे २ कि.मी. अंतरावर वसले. हे मुल्हेर गाव महाभारतकालीन आहे. याचे नाव होते रत्नपूर. या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि गावाला मयूरपूर नाव पडले. तर किल्ल्याला मयूरगड हे नाव पडले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा याचे नाव औरंगगड असे ठेवण्यात आले. पुराणात मुल्हेरचा उल्लेख येतो. मात्र खात्रीलायक माहिती चौदाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मिळते. मुल्हेरचा किल्ला बागुल राजांनी बांधला. इ.स. १३०८ ते १६१९ पर्यंत बागुलांनी येथे राज्य केले. या घराण्याच्या नावावरूनच परिसराला बागुलगेड व त्याचा अपभ्रंश बागलाण हे नाव पडले. बागुल राजे हे मुळचे कनोजचे. या बागुल घराण्याच्या काळातच जगप्रसिद्ध मुल्हेरी मूठ बनवण्यात आली.
               या घराण्यात एकूण ११ राजे झाले. या राजांना बहिर्जी ही पदवी होती. विजयनगरमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कितीतरी अगोदर बागलाण मध्ये हिंदूसत्ता प्रस्थापित होती. अकबराने जेव्हा खानदेशाचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशहा बहिर्जी बागलाणचा राजा होता. त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले. पुढे शाहजहानशी या राजाने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. जुलै १६३६ ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. इ.स. १६३८ मध्ये मोगलांनी बागलाणवर हल्ला केला आणि मुल्हेर किल्ला जिंकला व त्याचे नाव औरंगगड असे ठेवले. १५ फेब्रुवारी १६३८ रोजी वैभवशाली हिंदुंचे राज्य संपुष्टात येऊन तेथे मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. मुल्हेर ही बागलाणची परंपरागत राजधानी.

                                  
                                                                              किल्ल्यावर महंमद ताहिर याची नेमणूक प्रथम किल्लेदार म्हणून झाली. या ताहिरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव वसवले व त्याचे कालांतराने ताहिराबाद असे नामकरण झाले. इ.स. १६६२ मध्ये मुल्हेर किल्ल्यामधील सैनिकांनी अपु-या पगारासाठी बंड केले. दुस-या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी साल्हेर, मुल्हेर व इतर किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. मराठांनी १६७१ मध्ये प्रथम मुल्हेरवर हल्ला केला पण किल्लेदाराने तो थोपवून धरला. मग मराठांनी त्याचा नाद सोडला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठांनी मुल्हेरगड काबीज केला. त्यानंतर पुन्हा किल्ला मोगलांच्या हातात पडला.पुढे इ.स. १७५२ च्या भालकीच्या तहानुसार मुल्हेरसकट खानदेशमधील सर्व प्रदेश मराठांच्या हाती आला. यानंतर त्रिंबक गोविंद मुल्हेरचा किल्लेदार झाला. पुढे १७६५ मध्ये किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आहेत. अशा रीतीने १५ जुलै १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटिशांच्या तावडीत सापडला.
  


 
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
             
                 मुल्हेरगडाचे प्रामुख्याने २ भाग पडतात. एक म्हणजे मुल्हेर माची आणि मुल्हेर बालेकिल्ला. गणेशमंदिरा पासून २ वाटा फुटतात. एक वाट वर चढत जाते व दुस-या वाटेला येऊन मिळते. या वाटेने डावीकडे
गेल्यावर १० मिनिटांतच सोमेश्र्वर मंदिर लागते तर उजवीककडे जाणारी वाट आणि गणेशमंदिरा पासून निघणारी उजवीकडची वाट एकत्र येऊन मिळतात. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक पठार लागते. पठारापासून दोन वाटा लागतात. वर जाणारी वाट मोती तलावापाशी जाते. या टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. पठारापासून समोर जाणारी वाट राजवाडांच्या भग्र अवशेषांपाशी घेऊन जाते. येथेच एक गुप्त दरवाजादेखील आहे. राजवाडांच्या थोडे खाली आल्यावर रामलक्ष्मण मंदिर लागते. राजवाडांच्या वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर मुल्हेर व हरगड यांमधील खिंड लागते. 
               
                   सोमेश्र्वर मंदिराकडे जात असताना वाटेतच डावीकडे ३ मजली चंदनबाव लागते. सध्या येथे प्रचंड झाडी झुडूपे आहेत. सोमेश्र्वर मंदिर राहण्यासाठी उत्तम जागा आहे. मोती टाक्यांच्या उजवीकडे वर चढत जाणा-या वाटेने अर्धा तास चालल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचतो. आत गेल्यावर डावीकडे गुहा आहेत, तर समोरच पाण्याचं टाकं आहे. मुल्हेरगडाचा बालेकिल्ला म्हणजे मोठे पठार. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच पाण्याची ९-१० टाकी आहेत. राजवाडाचे भग्रावशेष, भडंगनाथांचे मंदिर या सर्व गोष्टी आहेत. भडंगनाथांच्या मंदिराच्या वर असणा-या टेकडीवरून खाली उतरलो की मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. समोरच असणारी मांगी-तुंगीची शिखरे, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमानगड लक्ष वेधून घेतात.

गडावर जाण्याच्या वाटा : मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. या दोन्ही वाटा मुल्हेर गावातूनच जातात. मुल्हेर गाव ते किल्ल्याचा पायथा यात २ कि.मी. चे अंतर आहे. गावातून २५ मिनिटे चालत पुढे आल्यावर डावीकडे एक घर लागते, आणि समोरच वडाचे एक झाड दिसते. झाडापासून सरळ पुढे जावे. दहा मिनिटांतच धनगरवाडी लागते. धनगरवाडी
वरून जाणारी वाट पकडावी. साधारण ४५ मिनिटांनी २ वाटा फुटतात. एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.सरळ वाट : सरळ जाणा-या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास दीड तास पुरतो.
          
                उजवीकडची वाट : उजवीकडच्या वाटेने गेल्यावर दोन तासांनी आपण मुल्हेरमाची वरील गणेश मंदिरात पोहचतो. या वाटेनेही गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ही वाट जरा दूरची आहे. ही वाट हरगड व मुल्हेर किल्ला यांच्या खिंडीतून वर चढते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर तर उजवीकडे हरगड लागतो. या वाटेने गडावर पोहचण्यास ३ तास लागतात.राहण्याची सोय : मुल्हेरमाचीवरील सोमेश्र्वर आणि गणेश मंदिरात आणि बालेकिल्ल्यावर असणा-या गुहेत राहता येते.


जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : गडावरील मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. मात्र हे पाणी फेब्रुवारीपर्यंतच उपलब्ध असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : साधारण २ तास गावापासून. साधारण ३ तास खिंडीतल्या वाटेने


किल्ले वारुगड

माणागंगा नदी जिथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीवर एक किल्ला आहे त्याचे नाव आहे वारुगड.किल्ला माण तालुक्यात
दहिवडीच्या ईशान्येस २० मैलांवर आहे.


इतिहास :

किल्ला शिवरायांनी बांधला असे सांगतात.या किल्ल्याचा किल्लेदार परभू जातीचा होता.२०० पहारेकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती.१८१८ मध्ये सातारच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुस-या बाजीरावाकडून घेतला. 


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

 किल्ला हा दोन भागात मोडतो.एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला.
१. वारुगड माची
किल्ल्याच्या माचीवर गेल्यावर समजते की गडाचा घेरा केवढा मोठा आहे.किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदीवेष्टीत आहे.आजही ती ब-याच मोठा प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतूनच पुढे जातो.या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते.मात्र स स्थितिला दोनच शिल्लक आहे गिरवी जाधववाडी या मार्गेमाचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाजातून वर येते.तर मोंगळ -घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुस-या दरवाजातून वर येते. माचीवर घरांचे ,वाडांचे अनेक अवशेष आहेत.दोन ते तीन पाण्याची टाकी,तळी सुध्दा आहेत.माचीवर भैरोबाचे जीर्णोध्दारीत मंदिर सुध्दा आहे.मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते.संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात.


२. बालेकिल्ला
गिरवी जाधववाडीतून माचीवर येणारा रस्ता दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभागला जातो.उजवीकडे आणि डावीकडे जाणरा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन धडकते.दरवाजाची तटबंदी आजही शाबूत आहे.बालेकिल्यावर पोहचल्यावर समोरच एक सदरेची इमारत आहे.आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे.समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे.विहीर ब-याच प्रमाणात बुजलेली आहे. किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहीला की आपल्याला जाणवते की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे.समोरच दिसणारा सीताबाईचा डोंगर , महादेव डोंगररांग हा परिसर दिसतो.संतोषगडवरून सीताबाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते.
गडावर जाण्याच्या वाटा : वारुगडावर जायचे असल्यास फलटण गाठावे.फलटण पासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत. वारुगड मुख्यतः दोन भागात विभागला आहे.एक गडाची माची यावर घोडेवाडी नावाची वस्ती आहे. तर दुसरा वारुगडाचा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी माचीतूच जावे लागते.माचीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गाडीरस्ता आहे जो थेट माचीत जातो तर दुसरा मार्ग म्हणजे पायवाट जी थेट किल्ल्यावर घेऊन जाते.


१. फलटण ते गिरवी
फलटण ते गिरवी अशी एस टी सेवा उपलब्ध आहे.गिरवीतून ५ किमी अंतरावर असणारा जाधववाडा गाठावा.जाधववाडा हे किल्ल्याच्या पाययाचे गाव आहे.येथून वारुगड माचीवर जाण्यास २ तास लागतात.माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे पुरतात.
२. फलटण दहीवडी
फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २० किमी अंतरावर मोंगळ नावचा फाटा लागतो.या फाटापासून एक कधा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो.मोंगळ ते घोडेवाडी अंतर १५ कि.मी चे आहे. फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २६ किमी अंतरावर बीजवाडी नावचे गाव लागते.या गावातून एक कधा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडीत जातो.पुढे हा रस्ता वर सांगतिलेल्या रस्त्याला येऊन मिळतो
राहण्याची सोय : वारुगडाच्या माचीवर असणा-या भैरवगडाच्या मंदिरात १०० लोंकांची सोय होते
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी
पाण्याची सोय : माचीवर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : जाधववाडीतून दोन तास लागतो
.जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत जाता येते.

किल्ले वसंतगड

पुणे बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यामधून जातो. या महामार्गावर सातारा उंब्रज कर्हाड अशी गावे आहेत. यात उंब्रज आणि कर्हाड यांच्या मधे पश्चिमेकडे इतिहास प्रसिद्ध तळबीड हे गाव आहे. तळबीड गाव वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या महामार्गावर तळबीड फाट्याला उतरुन तीन कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कर्हाडवरुन एस. टी. बसेस ची सोय आहे. वसंतगडइतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा एक रांगडा किल्ला होय.तळबीड गावाने मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाला दोन अमूल्य रत्ने अर्पण केली. ते म्हणजे युद्धशास्त्रनिपुण सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई होय
 

कसे जाल?

    * वसंतगडास भेट देण्यासाठी आपण आधी कराड गाठावे. येथून उत्तरेला दहा कि.मी. अंतरावर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या           तळबीड गावात दाखल व्हायचं. येथे समोरच आपणास सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते. गावातूनच गडावर         वाट जाते. गडावर पोहोचण्यासाठी 45 मिनिटे लागतात.
    * दुसरा रस्ता सुपने या गावातून ही आहे.
    * तिसरा रस्ता हा वसंतगड या गावातून जाणारा आहे.कोकणात जाताना खिडींत असणारा हा रस्ता पूर्वीचा राजमार्ग होता.


इतिहास


वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली. इ.स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. वसंतगडाजवळच मसूरला सुलतानजी जगदाळे राहत होता. अफजलखान चालून आला त्यावेळी वतनाच्या लोभाने जगदाळे फितुर झाला. वसंतगड घेतल्यावर मराठ्यांनी अकस्मात छापा घालून जगदाळेस पकडून गडावर आणले व फितुरीबद्दल त्याचा गडावर शिरच्छेद केला. शिवरायांच्या कठोर न्याय वसंतगडाने याची देहा याची डोळा अनुभवला. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छ. राजाराम महाराज वसंतगडावर काही दिवस मुक्कामास होते.

इ.स. १७०० साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. व त्याचे नाव 'किली-द-फतेह' असे ठेवले. पण इ.स. १७०८ साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला.                                    


गडावरील प्रेक्षणीय स्थळे

गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो. मंदीर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदीर परिसर पाहून डाव्या बाजून मंदीराच्या बाहेरील वाटेने आपण पुढे जायचं. वाटेत आपणास चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाधी व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
 
 
किल्ले सिंहगड
पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फुट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठुनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापुर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.


इतिहास


पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर  याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड  हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला.सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या  काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळच्या सैन्याने  हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि जीवनाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव सिंहगड  असे बदलले. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.या युध्दाबाबत सभासद बखरीत खालील उल्लेख आढळतो:


                    

तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करुन वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योध्दे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सुर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.


                       गडावरील ठिकाणे

दारूचे कोठार 
    दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे दिसणार्या कोठारावर दि. सप्टेंबर ११ इ.स. १७५१ मध्ये वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसाचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला 
    रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या बंगल्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक राहण्यासाठी येत. इ.स. १९१५ साली लोकमान्यांची आणि महात्मा गांधींची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढाणेश्वर 
    हे शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी आणि सांब असून हे मंदिर यादवकालीन आहे.

देवटाके 
    तानाजी मालूसरे यांच्या स्मारकाच्या मागे डाव्या हाताला हे प्रसिद्ध पाण्याचे टाके आहे. याचा उपयोग आजही पिण्याचे पाण्यासाठी म्हणून होत आहे. म. गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा 
    गडाच्या पश्चिमेस असणारा ह्या दरवाजावर खालील शिलालेख आढळतो                     

गडावर जाण्याच्या वाटा


सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट  बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरु मैदानाकडून जाणारा हा रस्ता अंदाजे ३५ कि.मी. आहे.

मार्ग 
    स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.

स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी उपलब्ध असतात.

किल्ले सरसगड
पालीगावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे.

पायथ्याच्या पाली गावातून इथं येउन किल्ला पाहणे ३-४ तासांत होते. या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैल्या, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंड असणारे उन्हेरे असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो. पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायक क्षेत्र बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर या सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे.


                     

इतिहास


इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले. नंतर हे किल्ले आदिलशाहीत जमा झाले. शिवशाहीत येताना नारो मुकुंदाना सुधागड, सरसगडाची सबनिशी मिळाली. सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले गेले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती.


                                 


गडावरील ठिकाणे


बालेकिल्ल्याच्या माथ्यावर महादेवाचे मंदिर आणि शाह्पीराचे ठिकाण आहे.

                
            


गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी पाली गावा मधुन दोन वाटा आहेत.पहिली आहे उत्तरेकडून राम आळीतून व दुसरी आहे देउळवाड्य़ातून. दक्षिणेच्या बाजूकडील कातळमाथ्याला एक मोठी नाळ आहे. नाळेतून ९६ भक्क्म पायर्या चढल्यावर मुख्य दरवाजा येतो. मध्यभागी असण्यार्या वाटोळ्या सुळक्याभोवती चक्कर मारता येते. या ५० मीटर उंचीच्या बालेकिल्ल्याच्या तळाशी टाकी, तळी, कोठ्या, गुहा, तालीमखाने आहेत. याच गुहांमधे पांडवानीही वस्ती केली होती असे म्हणतात.


किल्ले रसाळगड
सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे. 

 
                   गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : 

                रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास पुरतो. रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिले प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्या दरवाजात पोहचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्टच आहे. किल्ल्यावर लहानमोठा मिळून सुमारे १६ तोफा आहेत.संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय. समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाडात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाडांचे मोठा प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजाव तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठा प्रमाणावर आहेत. म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठा प्रमाणावर नांदता असावा. 

         

                                              गडावर जाण्याच्या वाटा :
१.
खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणार्या हुंबरी फाटावर उतरायचे. हुंबरी फाटापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणतः बीड गावात पोहचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.

२.
खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गेकिल्ला गाठता येतो. वाट अत्यंत सोपी आहे.

३.
खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस. टी. पकडावी. मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गेदोन तासात रसाळगड गाठावा. वाट अत्यंत सोपी आहे.


राहण्याची सोय :
झोलाई देवीचे मंदिर (३० ते ४० माणसे राहू शकतात.)

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी
पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे. 
जाण्यासाठी लागणारा वेळ : रसाळवाडीतून (१५ मिनिटे)
किल्ले रायरेश्र्वर
Category: About Maharashtra
पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार. भोरपासून ८ कि.मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.दाट झाडी, खोल दर्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट. यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.


इतिहास :
 शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्र्वराच्या डोंगरावर. मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल निश्चित विधानमांडता येणार नाही.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : रायरेश्र्वरावर पाहण्यासारखे फार काही नाही. रायरेश्र्वराचे पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतुत पाहण्यासारखे असते. रायरेश्र्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर लक्षात येत नाही. पठारावर अलिकडेच गावं वसलेली आहेत. पठारावर भात शेतीचे प्रमाणही मोठे आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्र्वर, कोल्हेश्र्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा : 

रायरेश्र्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे.
१.
टिटेधरण कोर्लेबाजूने

पुण्याहून भोरमार्गेआंबवडे गाठावे. तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने
रायरेश्र्वरावर जाता येते. वेळ साधारण ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड
आहे.


२.
भोर-रायरी मार्गे


भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी ६ वाजता
(मुक्कामाची) गाडी येते. याच वाटेला सांबरदर्याची वाट म्हणून देखील
संबोधतात. या वाटेने रायरेश्र्वर गाठण्यास दोन तास लागतात.

३. केजंळगडावरुन केजंळगडावरुन सूणदर्याने किंवा श्र्वानदर्याने सुध्दा रायरेश्र्वरला जाता येते. राहण्याची सोय : रायरेश्र्वरावर मंदिरात किंवा गावात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय : आप
ण स्वतः करावी. पाण्या

2 comments: